Skincare Tips: जस-जसे वय वाढत जाते तसे आपल्या चेहऱ्यात बदल होत जातात. हार्मोन्स बदलाने चेहरा निस्तेज दिसू लागतो. तसेच पर्यावरणातील बदलांचाही आपल्या शरीरावर परिणाम होतो. याचा परिणाम आपले वय दिसू लागते. यासाठी काही गोष्टींची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी तुम्ही काही खास स्किनकेअर रूटीन ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आज आम्ही तु्म्हाला काही टिप्स देणार आहोत कोणत्या चला जाणून घेऊया.
वयाच्या ४० व्या वर्षी अशा प्रकारे घ्या त्वचेची काळजी
त्वचा स्वच्छ करा- कोणत्याही स्किनकेअर रूटीनमध्ये सुरुवात करत असताना त्वचा स्वच्छ करून घ्या. यासाठी चांगला जो तुमच्या स्किन टोननुसार असेल असा क्लिन्झर निवडा. ज्या क्लिन्झरमध्ये हायलुरोनिक अॅसिड आणि ग्लिसरीन असते असे क्लिन्झर निवडा.
सनस्क्रीनचा वापर करा – सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन लोशन वापरणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमची त्वचा निरोगी आणि तरुण राहते. सनस्क्रीन घेताना लक्षात ठेवा की ते SPF 30 किंवा त्याहून अधिक असावे. घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा, पण घरी असलात तरी त्याचा वापर करा. घरात राहून तुम्ही कमी एसपीएफ सनस्क्रीन वापरू शकता.
त्वचेला हायड्रेट करा- वयानुसार तुमची त्वचा पातळ होते आणि आर्द्रता कमी होते. ज्यामुळे कोरडेपणा आणि निस्तेजपणा येऊ शकतो. याचा सामना करण्यासाठी आपली त्वचा आतून आणि बाहेरून हायड्रेट करणे महत्वाचे आहे. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटिंग स्किनकेअर उत्पादने तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करा, जसे की हायलूरोनिक अॅसिड, कोरफड किंवा ग्लिसरीन असलेले सीरम किंवा मॉइश्चरायझरचा वापर करावा.
डोळ्यांची विशेष काळजी घ्या- डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा खूप मऊ असते म्हणूनच डोळ्यांभोवती लवकर सुरकुत्या दिसू लागतात. अशावेळी डोळ्यांखाली हायड्रेटिंग आय क्रीम किंवा सीरम लावून वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करता येते.
पुरेशी झोप घ्या- निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे किंवा चेहऱ्यावर सूज देखील येऊ शकते. हे होऊ नये यासाठी रोज ७-९ तास झोप घ्या. याचा फायदा त्वचा निरोगी राहण्यासाठी होतो.
निरोगी आहार महत्त्वाचा – संतुलित आहार घेतल्याने तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. तुमच्या शरीराला आणि त्वचेला आवश्यक पोषक द्रव्ये देण्यासाठी भरपूर फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने खा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि जास्त मीठ किंवा अल्कोहोलचे सेवन टाळा. अशाप्रकारे जर तुम्ही त्वचेची काळजी घेतली तर तुम्हालाही चाळीशीत अठराव्या वयाचा फिल येईल.
Previous Articleथंड पाणी पिणे योग्य की अयोग्य?
Next Article पंतप्रधान मोदी 71 हजार तरुणांना देणार नियुक्तीपत्र









