काश्मीरमध्ये अंमलबजावणी : जीपीएस बसवून हालचालींवर लक्ष ठेवणार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जामिनावर सुटलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर नजर ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जीपीएस अँकलेटचा वापर सुरू केला आहे. सदर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करणारे काश्मीर पोलीस हे देशातील पहिले पोलीस दल ठरले आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित गुलाम मोहम्मद भट याला भारतातील पहिला जीपीएस ट्रॅकर बसवण्यात आला आहे. गुलाम 2007 च्या टेरर फंडिंग प्रकरणात आरोपी आहे. त्याच्या पायामध्ये जीपीएस अँकलेट सिस्टीम अंतर्गत कुलूप घातले आहे. यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाकडून त्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.
जम्मूच्या विशेष एनआयए न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुलाम भट याला जीपीएस ट्रॅकर बसवला आहे. गुलाम भट हा उधमपूरमधील अनेक प्रकरणात आरोपी आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. गुलामला अडीच लाख ऊपये टेरर फंडिंग करताना पकडण्यात आले होते. तो हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहे. एनआयए आणि दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयानेही त्याला दहशतवादी कटाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे.
जामीन, पॅरोल आणि नजरकैदेत असलेल्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये अशा जीपीएस अँकलेटचा वापर केला जातो. त्यामुळे तुऊंगातील गर्दी कमी होते. आता हा प्रयोग भारतातही करण्यास प्रारंभ झाल्याचे दिसत आहे.
यावषी 24 ऑगस्ट रोजी गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीनेही तुऊंग सुधारणांबाबत अहवाल सादर केला होता. यामध्ये त्यांनी जामिनावर सुटलेल्या कैद्यांसाठी किफायतशीर जीपीएस ब्र्रेसलेट किंवा अँकलेट ट्रॅकर बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा शोध घेण्याची सूचना केली होती.









