त्वचेवरील अनेक समस्यांवर ग्लिसरीन औषधाप्रमाणे काम करतं. चेहऱ्यावरील सुरकुत्या, कोरडी त्वचा, त्वचेचं इन्फेक्शन, पिंपल्स या सर्वांवर ग्लिसरीन हा उत्तम पर्याय आहे.ग्लिसरीन मध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे याचा वापर अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये केला जातो.कोणत्याही त्वचेवर ग्लिसरीन उपयुक्त ठरते. याव्यतिरिक्त ग्लिसरीन आणखी कोणते फायदे आहेत हे आपण जाणून घेऊयात.
ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचे मिश्रण एकत्र करून लावल्यास त्वचा उजळते. थंडीच्या दिवसात जर कोरड्या त्वचेचा जर त्रास होत असेल तर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मिक्स करून झोपताना तुमच्या त्वचेवर लावा. काही दिवसातच तुम्हाला आराम मिळेल.
चेहऱ्यावरील डाग,पुरळ कमी करण्यासाठीही ग्लिसरीनचा वापर केला जातो. यासाठी लिंबूच्या सालावर ग्लिसरीन लावून ते चेहऱ्यावरील डागांवर चोळा. डाग हळूहळू कमी होतील.
फुटलेल्या ओठांवर ग्लिसरीन लावल्यास ओठ मुलायम होतात.तसेच ओठांचा काळेपणा कमी होतो.
पायांवरील भेगांवर एक चमचा ग्लिसरीन, एक चमचा लिंबाचा रस आणि हवं असल्यास एक चमचा गुलाबपाणी असं मिश्रण करून घ्या आणि टाचांना लावून सुकू द्या. मग थोड्यावेळाने मोजे घालून रात्रभर असंच राहू द्या. सकाळी टाचा कोमट पाण्याने धुवून घ्या. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल आणि टाचाही मऊ दिसू लागतील.
त्वचेसोबत केसांच्या आरोग्यासाठी देखील ग्लिसरीन उपयुक्त ठरतं.केसगळणे, केस दुभंगणे तसेच केसातील कोंड्यावर ग्लिसरीन अधिक प्रभावी ठरते.
केसातील कोंडा आणि टाळूला येणारी खाज दूर करण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब पाणी एकत्र करून केसांवर लावा. आंघोळ केल्यानंतर आपल्या हातावर थोडेसे मिश्रण घेऊन केस आणि टाळूवर योग्य पद्धतीने लावावे.काही दिवस सलग हा उपाय केल्यास केसांमधील कोंडा दूर होईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









