जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांचे आवाहन : सत्तरीतील पाणी वाटप संस्थांना आर्थिक मदतीच्या मंजुरीपत्रांचे वितरण
प्रतिनिधी /वाळपई
पाणी वाटप संस्थांनी माध्यमातून शेतकऱयांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या संस्थानी कार्यरत रहावे. त्याचप्रमाणे धरणाच्या पाण्याचा वापर वेगवेगळय़ा प्रकारची लागवडी करण्यासाठी करण्यात यावा. पाण्याची नासाडी होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
या संस्थांच्या मदतीने पाटबंधाऱयांची दुरुस्ती व साफसफाई केली जाते या पाणी वाटप संस्थाना जलसिंचन खात्यातर्फे यंदा आर्थिक सहकार्य केले आहे. प्रत्येक पाणी वाटप संस्थेला अंदाजे तीन लाखांची आर्थिक मदत दिली असून त्यासंदर्भाच्या मंजुरी पत्रांचे वाटप 16 संस्थांना नुकतेच जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. केरी येथील जलसिंचन खात्याच्या विश्रामगृहात हा कार्यक्रम पार पडला.
अजुंणे धरण प्रकल्पामुळे केरी, मोर्ले, पर्ये आदी भागातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे. या धरणाचे पाणी पाटबंधाऱयाद्वारे शेतकऱयांसाठी उपलब्ध होत असते. यामुळे विविध प्रकारची लागवड करण्यात आलेली आहे.
अंजुणे धरणाचे पाणी वेगवेगळय़ा भागांमध्ये वितरित केले जाते. यासाठी गोवा सरकारच्या मान्यतेने पाणी वाटप संस्थांची स्थापना करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी वाटप संस्थांद्वारे पाण्याचा विनियोग करून शेतकऱयांना कृषी लागवडीसाठी केला जातो. केरी, मोर्ले व पर्ये आदी भागातील शेतकऱयांना पाणी वाटप संस्थाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होते. त्यामुळे या भागातील जमिनी लागवडीखाली आल्या आहेत. यामुळे पाणी वाटप संस्था कृषी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत आहेत. या पाणी वाटप संस्थांना जलसिंचन खात्याचे सहकार्य लाभते.
पाटबंधाऱयांची दुरुस्ती व साफसाफई त्वरित करा!
मंत्री सुभाष शिरोडकर यांनी 15 नोव्हेंबरपासून अंजुणे धरणाच्या पाण्याचा पुरवठा शेतकऱयांना होणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. यामुळे या निधीचा वापर करून शक्मय तेवढय़ा लवकर पाठ बंधाऱयांची दुरुस्ती करून ती साफसफाई करण्यात यावी असे आवाहन जलसिंचन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले आहे. एकूण 16 पाणी वाटप संस्था आहेत. या संस्थेवर कार्यकारी मंडळ असते. या कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून संबंधित भागातील शेतकरी बांधवांना व्यवस्थित पाण्याचा पुरवठा करण्यात येत असत पुढील काळात पाणी वाटप संस्थाना जास्तीजास्त सुविधा उपलब्ध करण्यासाठी खात्यातर्फे निश्चितच प्रयत्न केले जातील, असे यावेळी मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले की पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातून धरण प्रकल्पाच्या संपादित भागामध्ये मोठय़ा प्रमाणात कृषी लागवडीला चालना प्राप्त झालेली आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या कृषी लागवडी करण्यात आलेल्या आहेत. येणाऱया काळातही शेतकऱयांनी कृषी लागवडीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी, अधीक्षक अभियंता अंकुश गावकर व इतर अधिकाऱयांची उपस्थिती होती.









