‘आप’च्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अशोकनगर येथे उभारण्यात आलेल्या क्रीडासंकुलाचा पूर्ण प्रमाणात वापर सुरू करावा, या मागणीसाठी सोमवारी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले आहे. अशोकनगर येथील क्रीडासंकुलाचा पूर्ण प्रमाणात वापर होताना दिसत नाही. ते त्वरित नागरिकांसाठी खुले करावे व आवश्यकतेनुसार या क्रीडासंकुलाचे नूतनीकरण करावे. नागरिकांसाठी तेथे सोयी पुरवाव्यात, अशी मागणी आपचे विजय पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.









