वृत्तसंस्था /माँट्रीयल
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या कॅनेडियन खुल्या महिलांच्या 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसीका पेगुलाने एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना सॅमसोनोव्हाचा एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेत शुको अयोमा आणि इना शिबाहिरा यांनी महिला दुहेरीचे जेतेपद मिळविताना क्रॉझेक व स्कूर्स यांचा 6-4, 4-6, 13-11 असा पराभव केला. या स्पर्धेतील अंतिम लढतीत तृतीय मानांकीत पेगुलाने सॅमसोनोव्हाचा 6-1, 6-0 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. पेगुलाचे 2023 च्या टेनिस हंगामातील हे पहिले तर वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील तिसरे विजेतेपद आहे. या विजयानंतर पेगुलाने महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत अव्वल स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत पेगुलाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या गॉफचा त्यानंतर उपांत्य सामन्यात पोलंडच्या टॉपसिडेड स्वायटेकचा पराभव करत अंतिमफेरी गाठली होती. 24 वर्षीय सॅमसोनोव्हाने रिबाकिनाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.









