वृत्तसंस्था/ dरस्प्लिट(क्रोएशिया)
डेव्हिस चषक फायनल्स टेनिस स्पर्धेच्या ड गटातील लढतीमध्ये नेदरलँड्सने अमेरिकेवर 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. तर दुसऱ्या एका लढतीत विद्यमान विजेत्या स्वीडनने कॅनडाचा 0-3 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली आहे.
अमेरिका आणि नेदरलँड्स यांच्यातील ड गटात झालेल्या लढतीत अमेरिकेच्या फ्रान्सिस टिफोईला दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्सच्या ग्रीकस्पुरने टिफोईचा 6-3, 6-7(5-7), 7-6(7-2) असा पराभव केला. या सामन्यात टिफोईने कोर्टवरील पंचासमवेत वादग्रस्त गुणाबाबत हुज्जत घातली. यावेळी त्याला ताकीदही देण्यात आली होती. या लढतीतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सच्या झेंट्सस्कल्पने अमेरिकेच्या टॉमी पॉलवर 7-6 (7-2), 6-2 असा पराभव केला. दरम्यान या लढतीतील झालेल्या दुहेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या राजीव रॅम आणि ऑस्टीन क्रायसेक यांनी नेदरलँड्सच्या कुलहॉप आणि मिडलकुप यांचा 7-6(7-5), 6-7(3-7), 6-3 असा पराभव केला. अलीकडेच झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत टिफाईने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. या स्पर्धेमध्ये नेदरलँड्सने आपल्या पहिल्या लढतीमध्ये फिनलँडचा पराभव केला होता. त्यामुळे आता नेदरलँड्सचा संघ ड गटातून आघाडीवर आहे.
अ गटातील झालेल्या लढतीत स्वीडनने विद्यमान विजेत्या कॅनडाचा 3-0 असा एकतर्फी फडशा पाडत या गटात आघाडीचे स्थान मिळवले आहे. या लढतीमध्ये पहिल्या एकेरी सामन्यात गॅब्रियल डायलोने स्वीडनच्या येमेरचा 6-4, 6-3 तर दुसऱ्या एका सामन्यात कॅनडाच्या व्हॅसेक पोस्पीसिलने स्वीडनच्या लियो बोर्गचा 7-6(7-5), 5-7, 6-2 असा पराभव केला. त्यानंतर कॅनडाच्या टेनिसपटूंनी दुहेरीचा सामना जिंकून विद्यमान विजेत्या स्वीडनचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. कॅनडाने गेल्या बुधवारी बोलोगेना येथे झालेल्या या स्पर्धेच्या लढतीत यजमान इटलीवर 3-0 अशी एकतर्फी मात केली होती. या स्पर्धेत अन्य लढतीत ऑस्ट्रेलियाने फ्रान्सवर 2-1 तर क गटातील लढतीत झेकप्रजासत्ताकने दक्षिण कोरियाचा 3-0 असा पराभव केला.









