वृत्तसंस्था /अँटवेर्प (बेल्जियम)
येथे नुकत्याच झालेल्या विश्व जिम्नॅस्टीक चॅम्पियनशिप स्पर्धेत सिमोन बाईल्सच्या नेतृत्वाखाली अमेरिकन महिला जिम्नॅस्ट संघाने विक्रमी सातव्यांदा अजिंक्यपद पटकावले. बुधवारी रात्री येथे झालेल्या विश्व जिम्नॅस्टीक चॅम्पियन स्पर्धेत अमेरिकन महिला जिम्नॅस्टने दर्जेदार कामगिरी केली. अमेरिकन महिला जिम्नॅस्ट सिमोन बाईल्सचे प्रमुख जिम्नॅस्टीक चॅम्पियन स्पर्धेतील 33 वे पदक आहे. 2013 साली बाईल्सने पहिल्यांदा विश्व जिम्नॅस्टीकचे विश्वजेतेपद पटकावले होते. अमेरिकन महिला संघाने 167.729 गुणासह हे अजिंक्यपद पटकावले. ब्राझीलने दुसरे तर फ्रान्सने तिसरे स्थान मिळवले.









