आयातशुल्कावर होणार चर्चा
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शुल्क धोरण लागू होण्यास आता केवळ 7 दिवस शिल्लक राहिले आहेत. याचदरम्यान दक्षिण-मध्य आशियासाठी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच मंगळवारपासून भारताच्या 5 दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान ते दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि शुल्काशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील.
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन हे भारतात वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत. याचबरोबर अनेक अन्य वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांची ते भेट घेतील. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारसाठी रुपरेषा तयार करण्यापासून देखील चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी 25-29 मार्चपर्यंत भारतात राहतील. यादरम्यान त्यांच्यासोबत अमेरिकन अधिकाऱ्यांची टीमदेखील भारत दौऱ्यावर असेल. हा दौरा भारतासोबत संतुलित व्यापार









