US Sanctions On Russia : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) या दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्ष सुरूचं आहे. अशातच आता अमेरिकेने रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)यांनी युक्रेनच्या ताब्यातील प्रदेशांसाठी करार केला आहे. रशियाच्या या कारवाईविरोधात अमेरिकेनं रशियाच्या १००० व्यक्तींवर व्हिसा निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये रशियन लष्कराचे सदस्य, बेलारूसी लष्करी अधिकारी आणि अनेक रशियन नागरिकांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने युक्रेनच्या युद्धकैद्याविरुद्ध मानवी हक्कांचे घोर उल्लंघन केल्याच्या निषेधार्थ हे निर्बंध लादल्याची माहिती यूएस स्टेट डिपार्टमेंटने एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी राष्ट्राला संबोधित करत असताना रशियावर नवीन निर्बंध घालत असल्याची घोषणा केली होती. यामध्ये त्यांनी रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









