वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ओपन मिश्र दुहेरी स्पर्धेसाठी जेनिक सिनरला एक नवीन जोडीदार मिळाला असून या स्पर्धेत एम्मा राडुकानू आणि कार्लोस अल्कारेझ ही जोडी पहिल्या फेरीत अव्वल मानांकित जोडीचा सामना करेल.
16 संघांपैकी उर्वरित संघ रविवारी निश्चित झाले आणि आज मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी ड्रॉ काढण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्या जोडीला 1 दशलक्ष डॉलर्स दिले जातील. अव्वल क्रमांकावर असलेला सिनर आता 10 वेळा महिला दुहेरीतील प्रमुख स्पर्धांत विजेत्या ठरलेल्या कॅटरिना सिनियाकोवासोबत खेळेल. सिनर खरे तर एम्मा नेवारोसोबत खेळणार होता. पण पुढील आठवड्यात मेक्सिकोतील मोंटेरी येथे होणाऱ्या महिला स्पर्धेत खेळण्यासाठी तिने माघार घेतली.
या स्पर्धेत उतरणार असलेल्या इतर जोड्या या दोन वेळा अमेरिकन ओपनमध्ये महिला विजेती ठरलेली नाओमी ओसाका आणि गेल मोनफिल्स, कॅरोलिना मुचोवा आणि आंद्रे ऊबलेव्ह आणि कॅटी मॅकनॅली आणि लोरेन्झो मुसेट्टी अशा आहेत. मुसेट्टीला इटालियन जस्मिन पाओलिनीसोबत खेळायचे होते, पण ती सिनसिनाटी फायनलमध्ये इगा स्वायटेकशी खेळणार असल्याने तिने माघार घेतली. स्वायटेक मात्र जोडीदार कॅस्पर रूडसोबत मैदानात दिसणार आहे.
अल्कारेझ आणि राडुकानू यांनी मागील अमेरिकन ओपनमध्ये एकेरीचे जेतेपद मिळविले होते. ही जोडी जेसिका पेगुला आणि जॅक ड्रेपर यांचा सामना करेल, ज्यांना प्रथम मानांकन देण्यात आले आहे. सिनर आणि सिनियाकोवा यांना आठ वाइल्ड कार्डपैकी एक देण्यात आले असून ही जोडी अलेक्झांडर व्हेरेव्ह आणि बेलिंडा बेन्सिक यांच्याविऊद्धच्या सामन्याने सुऊवात करेल.









