वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या नौदलाचे एफ/ए-18ई सुपर हॉर्नेट लढाऊ विमान लाल समुद्रात कोसळले आहे. हे लढाऊ विमान विमानवाहू युद्धनौका एस. ट्रूमनवर खेचले जात असताना ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका नौसैनिक जखमी झाला आहे. विमानासोबत त्याला खेचणारा टॅक्टरही समुद्रात कोसळल्याची माहिती अमेरिकेच्या नौदलाकडून देण्यात आली. अमेरिकेचे नौदल येमेनवरील हूती बंडखोरांवरील हल्ले गतिमान करण्यासाठी लाल समुद्रात तैनात आहे.









