वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळील आंतरराष्ट्रीय हद्दीत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात सहा जण ठार झाले आहेत. ट्रम्प यांनी ही ट्रुथ सोशलवर यासंबंधीची माहिती शेअर केली. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी पुष्टी करत सदर जहाज ड्रग्ज तस्करीसाठी ज्ञात सागरी मार्गावरून प्रवास करत होते. तसेच ते बेकायदेशीर ड्रग्जच्या नेटवर्कशी जोडलेले होते. सप्टेंबरपासून व्हेनेझुएलाच्या आसपास ड्रग्ज तस्करीच्या संशयित जहाजांवर अमेरिकन लष्कराच्या हल्ल्यात आतापर्यंत एकूण 27 जण ठार झाले आहेत.









