मागील काही दिवसांपासून युक्रेन व रशिया यांच्यात युद्ध सुरु आहे. यामुळे युक्रेनची आर्थिक स्थिती बिकट आहे. यात अमेरिकेने युक्रेनला मदत जाहीर केली आहे. एक अब्ज अमेरिकन डॉलरची लष्करी मदत देणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी सांगितले.
यामध्ये तोफखाना, तटीय जहाजविरोधी संरक्षण प्रणाली आणि प्रगत रॉकेट प्रणालींसाठी लागणारया दारूगोळ्याचा समावेश असणार आहे. दरम्यान, अमेरिका युक्रेनच्या लोकशाहीचं, सार्वभौमत्वेचं आणि प्रादेशिक अखंडतेचं सदैव रक्षण करेल असं बायडन यांनी यावेळी स्पष्ट केले.









