आळते / वार्ताहर
पंचक्रोशीत हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या आळते (ता. हातकणंगले) येथील हजरत रमजान सरमस्त वली (रह.अ.) दर्ग्याचा उरूस शुक्रवार दि. 5 मे ते 8 मे रोजी साजरा होणार आहे .उरूसाच्या निमित्ताने वेगवेगळे धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तरी याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन उरुस कमिटी व समस्त हिंदू मुस्लिम समाज आळते यांच्यावतीने फैयाज मुजावर, जावेद मुजावर , सद्दाम मुजावर यांनी केले आहे.
शुक्रवार दि . ५ मे रोजी पहाटे गलिफ व संदलचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे . शनिवारी ६ मे रोजी उरुसाचा मुख्य दिवस आहे . याच दिवशी झंकार बिट्स आर्केस्ट्रा सादर होणार असून रविवार 8 मे रोजी सुप्रसिद्ध छोटा चांद कादरी यांच्या कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. तीन दिवस होणाऱ्या कार्यक्रमास आम. राजूबाबा आवळे , माजी आम . राजीव किसनराव आवळे , माजी . जि. प. सदस्य अरुणराव इंगवले, दलितमित्र व माजी जि. प. सदस्य अशोकराव माने , हातकणंगले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर , पं.स. माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले , उपसरपंच अमित पाटील , पोलीस पाटील रियाज मुजावर , डिग्रजचे माजी सरपंच आण्णासो सायमोते, वडगाव बाजार समितीचे संचालक किरणराव इंगवले , दर्गा कमिटी अध्यक्ष बाबासो मुजावर , किसान दूध डेअरीचे चेअरमन सुभाष करके , शेतकरी दूध डेअरीचे चेअरमन् बाळगोंडा पाटील , उद्योगपती संदीप कारंडे, मनसे माजी जिल्हाध्यक्ष राजु गोरे , डॉ. अभिजीत इंगवले यांच्यासह माजी सरपंच ,उपसरपंच , ग्रा. प . सदस्य सदस्या , सामजिक कार्यकर्ते , उद्योगपती , दर्गा कमिटीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .
Previous Articleकोडोलीत चोरट्याने धूम स्टाईलने हिसडा मारून महिलेचे घंटन लांबवले
Next Article गुगवाड येथील जवानाचा अपघातात मृत्यू









