ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत
वेंगुर्ले (वार्ताहर)-
तुळस जैतिर मंदिर नजीक बाजारपेठ असलेल्या भागातील रमाकांत उर्फ रवींद्र विष्णू पेडणेकर यांच्या घराला काल गुरुवारी २८ डिसेंबरला सायंकाळी भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले. याची आज शुक्रवारी ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी घटनास्थळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या पाहणीअंती पेडणेकर कुटूंबीय व याठिकाणी भाड्याने दुकान असलेले आपा नागवेकर यांना तात्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली.
यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेनेचे हिमांशू परब, समिर शेटकर, उपविभाग प्रमुख नाना राऊळ, प्रशांत गावडे, शाखा प्रमुख किरण सावंत, नामदेव सावंत, गुंडू परब, दादा परब, राजन आरोस्कर आदी उपस्थित होते. यावेळी शैलेश परब यांनी पेडणेकर व नागवेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.