राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटिस बजावून दोन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे सांगितलं आहे. त्यात चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची बदनामी केली आहे, महिला आयोगाची गरिमा राखली नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.
चित्रा वाघ बालिशपणा करत आहेत. वाघ यांनी राज्य महिला आयोगाचा अवमान केलायं. भाकरीच्या तुकड्या एेवजी कपड्याच्या तुकड्यावर त्या बोलतायत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. ऊर्फी जावेदचं समर्थन कोण करतय कोण नाही याचा अधिकार चित्रा वाघ यांनी नाही. ज्या खुर्चीवर त्या बसल्या आहेत त्या खुर्चीपुरतं त्यांनी बोलण अपेक्षित होतं. त्यांचा संविधान आणि कायद्याचा अभ्यास कमी पडला असल्याचेही त्या म्हणाल्या.
Previous Articleअटल प्रतिष्ठानचा १९ वा वर्धापनदिन रविवारी
Next Article स्टायलिश लूकसाठी हे जॅकेट्स तुमच्याजवळ असायलाच हवेत








