Urfi Javed and Chitra Wagh Controversy : गेल्या अनेक दिवसापासून ऊर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीत. महाराष्ट्रात नंगा नाच चालू देणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद हिला दिला होता. तसेच सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरून मुंबई पोलिसांनी तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस बजावली.आज उर्फीला अंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवलं होतं. चौकशी दरम्यान ऊर्फीने भारताच्या राज्यघटनेने मला हा अधिकार दिला असल्याचे म्हटलं आहे. तसेच एकीकडे त्यांना हिंदु राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत असे ट्विट करत तिने म्हटलं आहे.
ऊर्फी ट्विट करत काय म्हणाली
एकीकडे त्यांना हिंदु राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत.हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे, तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कुठल्या संस्कृतीबद्दल बोलताय? असा सवाल तिने केला आहे. तिने ट्विट करत वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं आहे.
‘भारतीय संस्कृती’, बलात्कार, डान्सबार, राजकारणी महिलांना तिच्या कपड्यांमुळे मारण्याची उघडपणे धमकी देतात, हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही, अस ट्विट करत निशाणा लगावला आहे.
उर्फीने काही लेण्यांचे फोटो ट्वीट करत भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या असा सल्ला चित्रा वाघ यांना दिला आहे. या ट्विटमध्ये ती म्हणाली की, प्राचीन हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करत असत. हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती, खेळ, राजकारणात सक्रिय सहभाग होता. ते लिंग आणि स्त्री शरीर सकारात्मक लोक होते. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या असेही ती म्हणाली.
आता हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवणार?
पोलीस जबाबात उर्फी म्हणाली की, “मी एक भारतीय आहे, मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करायचा पूर्ण अधिकार आहे. भारताच्या राज्यघटनेने मला हा अधिकार दिला आहे. शिवाय मी माझ्या कामाच्या अनुषंगाने हे कपडे परिधान करते. त्यावरून माझं फोटोशूट होतं, कधीकधी कामाच्या गडबडीत मला कपडे बदलायला वेळ मिळत नाही तेव्हाच फोटोग्राफर बाहेर येऊन फोटोज काढतात आणि ते व्हायरल होतात. आता हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवणार?”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









