मुंबई :
प्लाझा वायर्स या मल्टीबॅगर प्रकारातील समभागाला सोमवारी अप्पर सर्किट लागले होते. समभागाचा भाव 112 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य यादरम्यान 500 कोटी रुपयांवर पोहचले होते. 12 ऑक्टोबर रोजी लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या समभागाला सलग आठव्या दिवशी अप्पर सर्किट लागले आहे. इशु किंमत 54 रुपये इतकी होती, त्यानंतर समभाग 110 टक्के वाढत व्यवहार करत होता. शुक्रवारी सरतेशेवटी 107 रुपयांवर समभाग बंद झाला होता.









