चेन्नई :
यूपीआय या देवाणघेवाणीतील महत्त्वाच्या प्रणालीचा वापर मार्चमध्येही दमदार दिसून आला आहे. मार्च 2025 मध्ये 24.77 लाख कोटी रुपयांचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून झाले आहेत. शिवाय दररोजचा व्यवहार पाहता 59 कोटी देवाणघेवाणीचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
यूपीआयची सुरुवात एप्रिल 2016 मध्ये झाली होती. यूपीआयने पहिल्यांदाच मूल्यामध्ये पाहता 24 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि देवाणघेवाणची संख्या 19 अब्जची संख्या पार करु शकली आहे. मार्च 2025 देवाणघेवाण व्यवहारांची संख्या तसेच व्यवहाराचे मूल्य या दोन्हीत विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. मार्चमध्ये एकूण 24.77 लाख कोटीच्या मूल्याचे व्यवहार झाले आहेत.









