वृत्तसंस्था/ मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)चे क्रेडिट कार्ड ग्राहकांना आता युपीआय शी लिंक करून व्यवहार करू शकता येणार आहेत. या सुविधेचा लाभ एसबीआय रुपे क्रेडिट कार्ड नोंदणी करून किंवा युपीआय अॅप्सशी लिंक करून घेता येईल.
भारताचे रुपे कार्ड
रुपे हे युपीआयद्वारे लॉन्च केलेले घरगुती प्लास्टिक कार्ड आहे. देशातील पेमेंट सिस्टीम एकत्रित करणे हा त्याचा उद्देश आहे. देशातील सर्व प्रमुख बँका रुपे डेबिट कार्ड जारी करतात. हे इतर कार्ड (युरोपे, मास्टरकार्ड, व्हिसा) सारखेच आहे आणि सर्व भारतीय बँका, एटीएम, पीओएस टर्मिनल किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवर सहजतेने काम करते.
कशी करता येईल लिंक
?आपल्या फोनवर युपीआय अॅप नसेल तर ते प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करता येईल
?मोबाईल नंबर अपडेट करुन युपीआय अॅपवर नोंदणी करावी
?नोंदणीनंतर अॅड क्रेडिट कार्ड किंवा लिंक क्रेडिट कार्ड पर्याय निवडावा
?व्रेडिट कार्ड सादरकरणाऱ्यांच्या सुचीमधून एसबीआय क्रेडिट कार्ड निवडणे
?यानंतर आपल्या क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक व कार्डची एक्सपायरी डेट टाकणे
?यानंतर 6 अंकी युपीआय पिन सेट करणे









