स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोणताही व्यवहार हा आॅनलाईन पेमेंट करून केला जातो. गुगुल पे, फोन पे आणि पेटीएमचा वापर करून आर्थिक व्यवहार केला जातो. दुधापासून ते भाजी घेण्यापर्यत पैसे आॅनलाईन पाठवले जातात. नेहमी ऑनलाईन पैसे पे करण्याची सवय असणाऱ्यांना मात्र इंटरनेट इशू आला की अस्वस्थ वाटू लागते. अचानक एखाद्याला अडी-अडचणीचा प्रसंग आला आणि तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर… घाबरू नका तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्याच्या मदतीने तुमची अडचण दूर होईल. याच बरोबर हि सुविधा फिचर फोनवरदेखील आहे. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने UPI 123pay या सुविधेच्या माध्यमातून कॉल करा, पे करा ही सुविधा सुरु केली आहे. याचाही माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
स्मार्टफोनवरून कसे पैसे पाठवाल
समजा तुमची इंटरनेट सुविधा बंद आहे. अशावेळी तुमच्या मोबाईलमध्ये *99#, एक USSD (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री सर्विस डेटा) आधारित मोबाइल बँकिंग सेवेचा उपयोग करू शकता. याच्या वापराने तुम्ही पिन बदलू शकता. तसेच तुमच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत हे देखील पाहू शकता. भारतात ८३ बँका ४ टेलिकॉम कंपन्याद्वारे ही सेवा पुरवली जाते. तसेच, हिंदी व इंग्रजीसह १३ विविध भाषेचा वापर तुम्ही करू शकता.
ऑफलाइन पेमेंटसाठी असे सेट करा अकाउंट
सर्वात प्रथम तुमच्या स्मार्टफोन अथवा फीचर फोनमध्ये *99# डायल करा.
जो मोबाइल नंबर वापरणार आहात तो तुमच्या बँक खात्याशी लिंक असावा.
यानंतर भाषा निवडा व बँकेचे नाव टाका.
तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यांची एक लिस्ट दिसेल. यातील योग्य बँक खात्याची निवड करा.
आता एक्सपायरी डेटसह डेबिट कार्डचे शेवटचे ६ आकडे टाका.
हि प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकता
विना इंटरनेट असे करा यूपीआय पेमेंट
तमच्या फोनवर *99# डायल करा व पैसे पाठवण्यासाठी १ टाका.
आता योग्य पर्याय निवडून ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीचा यूपीआय आयडी, फोन नंबर आणि बँक खाते टाका.
त्यानंतर रक्कम व यूपीआय पिन टाका.ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपोआप पेमेंट होईल.
पेमेंट करत असताना जास्तीत ५ हजार रुपयांपर्यंत तुम्हाला पैसे पाठवता येतात. मात्र प्रयासाठी ०.५० पैसे प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी द्यावे लागतील.
फिचर फोनवरून असे पाठवा पैसे
तुम्ही पहिल्यांदाच या सुविधेचा लाभ घेत असाल तर कॉल करतानाच त्याचे १२३ पे प्रोफाईल तयार होईल.
खातेधारकाचे ज्या बँकेत खाते आहे, त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
मोबाईल voice@psp च्या पद्धतीत ग्राहकाला दुस-या ग्राहकाचा युजर आयडी सांगितला जातो.प्री-डिफांईड आयवीआर क्रमांक, मिस्ड कॉल पे, ओईएम इनेबल्ड पेमेंट या चार प्रक्रिया कराव्या लागतता.
डेबिट कार्ड किंवा खात्याची संपूर्ण माहिती दिल्यानंतर युपीआय पिन जनरेट करावा लागतो. यासाठी फिचर फोनवर तुम्हाला ओटीपी पाठविण्यला जातो.यानंतर तुमचा व्यवहार पूर्ण होतो.
यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून ०८०४५७६३६६६, ६३६६२००२०० किंवा ०८०४५१६३५८१ या क्रमांकावर कॉल करा.पुढची स्टेप- हस्तांतरणाचा पर्याय निवडून युपीआय पिन टाका.आणि ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याला पाठवा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









