वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेक जायंट गुगलचे पेमेंट अॅप गुगल पे ने युपीआय लाइट भारतात लाँच केले आहे. या अॅपमुळे अल्प डिजिटल पेमेंट करणे सोपे होणार आहे. गुगल पे युपीआय लाइट वापरकर्त्यांना त्वरित पेमेंटसाठी दररोज 4,000 रुपये जमा करण्यास सक्षम राहणार असल्याची माहिती आहे.
पिन टाकण्याची गरज नाही
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे डिझाइन केलेले, हे वैशिष्ट्या अल्प पेमेंट करण्यासाठी युपीआय पिन प्रविष्ट करण्याची आवश्यकता नाही.
गुगलचे प्रोडक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष अंबरीश केंगे म्हणाले की, देशात डिजिटल व्यवहारांची संख्या वाढते आहे. अशावेळी पेमेंटची स्वीकृती वाढवण्यासाठी अशाच सुविधा आवश्यक आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने सप्टेंबर 2022 मध्ये हे वैशिष्ट्या सादर केले.









