मुंबई
वाराणसीतील उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांना त्यांचा आयपीओ सादर करण्यासाठी बाजारातील नियामक सेबीने नुकतीच मंजुरी दिली आहे. उत्कर्ष बँकेचा आयपीओ लवकरच येणार असून या अंतर्गत 500 कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. अलीकडेच बँकेने सेबीकडे मंजुरीकरीताची आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. कागदपत्रांची पडताळणी करून सेबीने अखेर आयपीओ सादरी करण्यास बँकेस हिरवा कंदील दाखविला आहे.









