मुंबई :
पोलाद उत्पादने बनवणारी कंपनी केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेड यांचा आयपीओ 15 मार्चला शेअर बाजारामध्ये खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 189 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे समजते.
के पी एनर्जी यानंतर केपी समूहातील ही तिसरी कंपनी आपला आयपीओ बाजारात सादर करत आहे. कंपनीने वर्ष 2016 मध्ये 6.44 कोटी रुपयांची उभारणी केली होती. सदरचा आयपीओ 15 मार्च रोजी खुला होणार असून 19 मार्च रोजी बंद होणार आहे. शेअर बाजारात हा समभाग 22 मार्चला सूचिबद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. 189 कोटी रुपयांची उभारणी आयपीओ अंतर्गत होणार असून 1.31 कोटी इक्विटी समभाग सादर केले जाणार आहेत.









