प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : राज्यातील उपजिल्हाधिकारी व तहसीलद सवंर्गातील बदल्या गुरूवारी झाल्या.यामध्ये प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची सातारा येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी बदली झाली.त्यांच्या जागेवर गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांची बदली झाली. शेंडगे सोमवारी (दि.31) पदभार स्विकारणार आहेत.
नूतन उपजिल्हाधिकारी शेंडगे हे मूळचे भूम (ता. जि. उस्मानाबाद) येथील आहेत. ते 2015 च्या बॅचचे उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांनी सोलापूर जिह्यात प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीला सुऊवात केली. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी सेवा बजावली. सध्या ते गडचिरोली येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आता त्यांची कोल्हापूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. ते सोमवारी पदभार स्विकारणार आहेत.









