वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या प्रो कबड्डी लीग हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने यूपी योद्धाजचा 42-29 अशा 13 गुणांच्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे जयपूर पिंक पँथर्सने आपली मोहीम पुन्हा विजयाच्या दिशेने सुरू केली आहे.
या सामन्यामध्ये नितीनकुमारची जयपूर संघातील कामगिरी सर्वोत्तम ठरली. दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या नितीनकुमारने या सामन्यात सुपर दहा गुण नोंदविले. चालु वर्षीच्या प्रो कब•ाr लीग हंगामातील नितीनकुमारची ही सुपर 10 गुण नोंदविण्याची आठवी खेप आहे. जयपूर पिंक पँथर्स संघातील इराणच्या अली समादीने सुपर 10 गुण नोंदविले. समादीने या स्पर्धेत आतापर्यंत चारवेळा सुपर 10 गुण नोंदविले आहेत. यूपी योद्धाज संघाविरुद्धच्या सामन्यात नितीनकुमारला समादीची चांगलीच साथ मिळाली. या सामन्यातील विजयामुळे जयपूर पिंक पँथर्सची वाटचाल पुन्हा विजयाच्या मार्गावर आली आहे.









