वृत्तसंस्था/ व्हिझाग
2025 च्या प्रो कब•ाr लिग स्पर्धेतील झालेल्या सामन्यात युती योद्धासने तेलगू टायटन्सचा 40-35 अशा गुणफरकाने पराभव केला. तर दुसऱ्या थरारक सामन्यात यू मुंबाने गुजरात जायंट्सचा टायब्रेकरमध्ये 6-5 असा पराभव केला.
युपी योद्धास आणि तेलगू टायटन्स यांच्यातील सामन्यात युपी योद्धासतर्फे गगन गौडाने सर्वाधिक म्हणजे 4 बोनस गुणांसह 14 गुण वसूल केले. कर्णधार सुमित सांगवानने 8 तर गुमानसिंगने 7 गुण नोंदविले. या सामन्यात सुमित सांगवानच्या भक्कम बचावफळीतील कामगिरीमुळे युपी योद्धासला शानदार विजय मिळविता आला. त्याला उपकर्णधार आशू सिंगची चांगली साथ लाभली. या दोघांनी आपल्या संघाला 9 गुण मिळवून दिले. तेलगू टायटन्सच्या विजय मिलीकची कामगिरी दर्जेदार होऊनही वाया गेली. त्याने तेलगू टायटन्सला आपल्या शानदार चढायावर 10 गुण मिळवून दिले. विजय मलिकने 3 बोनस गुणांसह सरासरी 14 गुण मिळविले. युपी योद्धासचा या स्पर्धेतील पहिला सामना होता. त्याना विजयाची नितांत गरज होती.
यू मुंबा वजयी
यू मुंबा आणि गुजरात जायंट्स यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी 29-29 असे समान गुण मिळविल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. टायब्रेकरमध्ये यू मुंबाने 6-5 अशा केवळ 1 गुणाच्या फरकाने विजय मिळविला. लोकेश गोसाविया आणि रोहित राघव यांनी प्रत्येकी 4 टॅकल गुण मिळविले. अजित चौहानने चढायावर 5 गुण मिळविले. अनिल आणि संदीपकुमार यांनी प्रत्येकी 3 गुण घेतले. सुनिलकुमारच्या शेवटच्या क्षणातील दर्जेदार कामगिरीने यू मुंबाला विजय मिळवून दिला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 मिनीटांच्या कालावधीत उभय संघातील खेळाडूंमध्ये कांही शाब्दिक चकमकी झाल्या. अजित चौहानने यू मुंबातर्फे गुणांचे खाते उघडले. तर हिमांशू सिंगने गुजरात जायंट्सला पहिला गुण मिळवून दिला. पहिल्या टाईमआऊटनंतर यू मुंबाने गुजरात जायंट्सवर 7-6 अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर गुजरात जायंट्सने आपल्या आक्रमक चालीवर यू मुंबा संघावर 4 गुणांची आघाडी मिळविली. सामन्याच्या मध्यंतरावेळी यू मुंबाने गुजरात जायंट्सवर 16-15 अशी अल्पशी आघाडी मिळविली. 40 मिनीटांच्या निर्धारित कालावधीत दोन्ही संघ 29-29 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. टायब्रेकरमध्ये यू मुंबाने गुजरात जायंट्सवर 6-5 अशी मात करत निसटता विजय मिळविला.









