हॅरिसची हॅट्ट्रिक, गौडचे 4 बळी, सामनावीर हेन्रीचे अर्धशतक
वृत्तसंस्था /बेंगळूर
2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेतील येथे शनिवारी झालेल्या आठव्या सामन्यात सामनावीर हेन्रीचे अर्धशतक तसेच हॅरीसची हॅट्ट्रीक आणि क्रांती गौडच्या 4 बळींच्या जोरावर युपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सवर 3 चेंडू बाकी ठेवून 33 धावांनी विजय मिळविला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आरसीबी, मुंबई आणि दिल्ली यांनी प्रत्येकी समान 4 गुणांसह अनुक्रमे सरस धावसरासरीच्या जोरावर अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले आहे.
शनिवारच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून युपी वॉरियर्सला प्रथम फलंदाजी दिली. युपी वॉरियर्सने 20 षटकात 9 बाद 177 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव 19.3 षटकात 144 धावांत आटोपला.
युपी वॉरियर्सच्या डावामध्ये हेन्रीने आक्रमक फटकेबाजी करताना केवळ 23 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकारांसह 62 धावा झोडपल्या. मॅकग्राने 23 चेंडूत 3 चौकारांसह 24, नेवगिरीने 3 चौकारांसह 17, कर्णधार दिप्ती शर्माने 2 चौकारांसह 13 तर इक्लेटोनने 2 चौकारांसह 12 धावा केल्या. युपी वॉरियर्सच्या डावात 25 अवांतर धावा मिळाल्या. दिल्ली कॅपिटल्सतर्फे जोनासेनने 31 धावांत 4 तर कॅप आणि रे•ाr यांनी प्रत्येकी 2 तसेच शिखा पांडेने 1 गडी बाद केला. युपी वॉरियर्सच्या डावात 9 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावामध्ये जेमिमा रॉड्रिग्जने 35 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 56, शेफाली वर्माने 4 चौकारांसह 24, निकी प्रसादने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18, शिखा पांडेने 2 चौकारांसह नाबाद 15 धावा जमविल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 20 वे आणि शेवटचे षटक महत्त्वाचे ठरले. युपी वॉरियर्सच्या ग्रेस हॅरिसने या षटकातील पहिल्याच चेंडूवर निकी प्रसादला, दुसऱ्या चेंडूवर अरुंधती रे•ाrला तर तिसऱ्या चेंडूवर मिनु मणीला बाद करत हॅट्ट्रीक साधली. हॅरिसने 15 धावांत 4 तर क्रांती गौडने 25 धावांत 4 तसेच शर्मा आणि हेन्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दिल्लीच्या डावात दोन षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक: युपी वॉरियर्स 20 षटकात 9 बाद 177 (हेन्री 62, मॅकग्रा 24, नेवगिरी 17, अवांतर 25, जोनासेन 4-31, रे•ाr व कॅप प्रत्येकी 2 बळी), दिल्ली कॅपिटल्स 19.3 षटकात सर्वबाद 144 (रॉड्रिग्ज 56, शेफाली वर्मा 24, पांडे नाबाद 15, प्रसाद 18, हॅरीस 4-15, गौड 4-25)









