वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2025 च्या महिलांच्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेसाठी युपी वॉरियर्स संघाच्या कर्णधारपदी दिप्ती शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हिलीकडे होते. पण पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
2024 च्या महिलांच्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत अष्टपैल्यू दिप्ती शर्माची कामगिरी दर्जेदार झाली होती. तिने त्या स्पर्धेत 8 सामन्यात 295 धावा तर गोलंदाजीत 10 गडी बाद केले होते.









