वृत्तसंस्था/ रांची
हिरो पुरस्कृत पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील झालेल्या सामन्यात युपी रुद्रासने गोनासिकाचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल कर्णधार हार्दिक सिंगने नोंदविला.
स्पर्धेच्या गुणतक्त्यात लीग फेरीच्या पहिल्या टप्प्याअखेर युपी रुद्रासने या विजयामुळे तिसरे स्थान मिळविले आहे. सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रात कर्णधार हार्दिक सिंगने युपी रुद्रासचा एकमेव निर्णायक गोल केला. युपी रुद्रासने या कालावधीत 2 पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. सामन्याच्या उत्तरार्धात गोनसिकाला युपी रुद्रासची बरोबरी करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. पण त्यांच्या खेळाडूंनी ही संधी वाया घालवली.









