शेतकऱ्यांवर आले मोठे संकट
नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यात काल (दि. २७) रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नंदुरबार जिल्ह्यातील काकळदा परिसरात अचानक काल पाऊस कोसळला असून, यामुळे शेतकरी मोठ्या संकटात अडकला आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अचानक काल अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. विशेषतः तूर, मका, तांदूळ, सोयाबीन या पिकांवर संकट ओढावले आहे. पावसामुळे या परिसरत अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतुकीची कोंडी झाली. परिसरातील लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी पाणी तुंबून राहिल्याने पिकांचे नुकसानीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पिकांची काढणी सुरू आहे. या दरम्यान अवकाळी आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी चिंता वाढली आहे.
Previous Articleसराईताकडून पिस्टल आणि काडतुसे हस्तगत
Next Article ओटवणे गाव चव्हाटा महोत्सव आजपासून








