Rain Update : राज्यातील अनेक भागांत काल अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी गारपिटीचा झाली आहे. गारपीटचा फटका पिकांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता-तोंडाचं पिक हातून गेल्याने जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
अवकाळी पावसाचा गहू, कांदा, हरभरा आणि आंबा पिकांना फटका बसला आहे. तसेच केळी , पपई , द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली, नंदूरबार, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांचं नुकसान झालं आहे. यामुळे सरकार आता काय मदत करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारतीय हवामान खात्याने अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 6 ते 8 मार्च दरम्यान, मध्य आणि पश्चिम भारतात वादळासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








