पाटण :
गेले पाच-सहा दिवस मौसमी पावसाच्या अगोदर अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानात पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हंगामी पारंपरिक शेतीबरोबर फळ झाडांच्या फळांचे, डोंगरी रानमेवाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. रानावनातून, डोंगरातून दिवस-विवसभर फिरून करवंद, जांभळ, तोरणं, अळू, कोकम आदी रानमेवा गोळा करून डोक्यावर पाटना फिरवून गावभर आणि शहरापर्यंत रानमेवा विकणाऱ्या डोंगरातील गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबरोबर आंबा, फणस या फळांची विक्री करून चार पैसे कुटुंबाच्या गुजराणासाठी गाठीशी करून ठेवणाऱ्या शेतकयांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या उन्हाळी रानमेव्यावर डोंगरातील भुमिपुत्रांचे अर्थकारण अवलंबून आहे. या अवकाळी पावसाने भुमिपुत्रांचे अर्थकारणच कोलमडले आहे.
डोंगरातील अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आंबा, फणस या फळांसह डोंगर रानावनातील रानमेवा आहे. या अवकाळी पावसाने रानमेवाच राहिला नसल्याने याबर अवलंबून असलेल्या गोरगरीब शेतमजूर, लहान शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा सारासार विचार करून शासनाने अशा लहान शेतकऱ्यांना मदतीचा हात बाया, अशी मागणी होत आहे.
नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान म्हणजे पेरणी आणि लागवड केलेल्या पिकांचेच नुकसान ग्राह्य धरले आहे. या अवकाळी पावसात उन्हाळी पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान तर झालेलेच आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान न मरुन येणारे आहेच. पण याबरोबर डोंगर माथ्यावरील सर्वसामान्य शेतकरी ज्यांच्याकडे अल्पशा गुंठ्यावर मोजण्याइतपत शेती आहे. काहीकडे शेतीच नाही पण शेतमजूर म्हणून दुसऱ्यांच्या शेतात काम करतात असे शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसात रानावनातील रानमेवा करवंद, जांभळं, आळू, कोकम आदी रानमेवाची वाट पहातात. या रानमेव्याचा हंगाम सुरू झाला की डोक्यावर पाठ्या घेऊन रानात, जंगलात विवसभर सगळीकडे फिरून तो गोळा करतात आणि शहरापर्यंत तो विकतात, महिना दोन महिने चालणाऱ्या या हंगामामध्ये बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मिळून जाते. मात्र चालू वर्षी वळिवाचा आणि अवकाळी पावसाला लवकर सुरुवात झाली. या पावसात रानमेव्याची झाडावरच नासाडी झाली. किड लागली असून रानमेवा अडून गेला. यासह आंबा, फणस या हंगामी फळांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे डोंगरातील व डोंगरमाथ्यावरील रानावनातील उन्हाळी हंगामावर अवलंबून असणाऱ्या गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले आहे.
- नुकसानीचा मापतंड काय- प्रशांत पाटील
उन्हाळी हंगामात ज्याला आपण रानमेवा म्हणतो ते करबंद, जांभळ, तोरण, आळू या रानमेव्याची विक्री करणारे व यावर अर्थकारण असणारे डोंगर पठारावरील भूमिपुत्र व काही आयुर्वेदिक औषध पारंपरिक विकून जगणारी कुटुंब यांचे नुकसान कोणत्या मापदंडात सरकार मोजनार? अलिकडे काही भूमिपुत्रांनी नवीन प्रयोग म्हणून आंबा लागवड व फणस लागवडीचा आधार घेत उत्पन्नाचा नवीन मार्ग स्वीकाला होता. अवकाळी पावसामुळे आंबा व फणस यथि मोठे नुकसान झाले आहे, सरकारने पाटण तालुक्यातील हे प्रश्न वेगळ्या मापदंडात मोजावे. नाहीतर भविष्यात पोटाला खायला नाही आणी हाताला काम नाही म्हणून हा तालुका औस पडला तर नवल वाटायच नको. भविष्यात भूमिपुत्र जगला पाहिजे यावर विचार व्हावा अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.








