अपघातांना ठरतात कारणीभूत : वाहतूक पोलीस करातात दुर्लक्ष
प्रतिनिधी /पणजी
दयानंद बांदोडकर मार्गावरील पॅप्टन ऑफ पोर्ट ते बिग डॅडी पॅसिनोपर्यंत पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भर रस्त्यावरच चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे सतत वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. तसेच कित्येक वेळा याठिकाणी अपघातही झालेले आहेत. तरी वाहतूक पोलीस उपस्थित राहूनही डोळेझाक करतात. यामुळे वाहन चालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
या मुख्य रस्त्यावरुन दररोज हजारो गाडय़ा जात असतात. सतत वर्दळ असलेल्या या महामार्गावर पार्किंग करता येत नाही मात्र कॅसिनो, क्रूझवर जाणाऱया पर्यटकांच्या गाडय़ा, तसेच कॅसिनोच्या चारचाकी गाडय़ा कित्येक तास एकाच ठिकाणी मुख्य रस्त्यावर उभ्या असतात. तसेच कॅसिनोतील कर्मचाऱयांना ने-आण करणाऱया मिनी बसेस देखील रस्त्यावरच थांबवून ठेवतात. त्यामुळे दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱया वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी 6 ते रात्री 12 वा.पर्यंत तर कॅसिनो ठिकाणी 15 ते 20 चारचाकी गाडय़ा एका रांगेत रस्त्यावर उभ्या असतात. या बेशिस्त पार्किंगवर कोण कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहतूक पोलिसांचा ‘हेल्मेट’वरच भर
सायंकाळच्या वेळी चार ते पाच वाहतूक पोलीस या मार्गावर एकाच ठिकाणी उभे राहून वाहन चालकांवर शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात त्यांचे जास्त लक्ष विना हेल्मेट येणाऱया चालकांना पकडून तालांव देण्यावर असतो. त्यामुळे ते उभे असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या करण्यात आलेल्या गाडय़ांवर ते कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यात जर त्या कॅसिनोच्या गाडय़ा असतील तर त्यांना साधी विचारणाही करण्यात येत नाही.
अपघातांना आमंत्रण
रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱया या अचानक रस्त्याच्या मधोमध येऊन पुढे जातात. त्यामुळे मागून येणाऱया गाडय़ांना ब्रेक लावावा लागतो व अपघात घडतात. कोणतील पूर्व कल्पना (साईड लाईट) न देता या गाडय़ा रस्त्यावर येतात. या बेशिस्त पार्किंगमुळे एखादा मोठा अपघात होऊन कुणाचा तरी मृत्यू व्हावा नंतर सरकार बेशिस्त पार्किंगवर कारवाई करणार काय असा संतात्प प्रश्न वाहन चालक उपस्थित करीत आहेत.
पॅप्टने ऑफ पोर्ट ते बिग डॅडी पॅसिनोपर्यंत दर दिवशी संध्याकाळी सात नंतर भर रस्त्यावर बेशिस्त पार्कींग केले जात असते. यावेळी रस्त्यावरून जाणाऱया वाहन चालकांना मोठी कसरत करीत आपली वाहने काढावी लागतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जत्रेत फिरत असल्या प्रमाणे पर्यटक फिरत असतात. पॅसिनोच्या बाजूने वाहतूक पोलीस फिरत असतात मात्र बेशिस्तपणे पार्कींग केलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत. पॅसिनोवाले आणि वाहतूक पोलीस यांचे साटेलोटे आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. संध्याकाळी सात नंतर मोठय़ाप्रमाणात लोक पॅसिनोत येत असतात. पॅसिनोत येणारे अधिकाधिक लोक चारचाकी वाहनांने येतात आणि थेट पॅसिनोच्या दारात येऊन उतरतात नंतर ते वाहन भर रस्त्यावरच पार्क केले जाते. या सगळ्या गोष्टी डय़ुटीवर असलेल्या वाहतुक पोलीसाच्या समोर होत असतात मात्र तो पोलीस त्यांना काहीही सांगत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. अनेकवेळा याबाबत वर्तमान पत्रातून बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. बातमी आली की काही दिवस कारवाई केली जाते नंतर पुन्हा तोच प्रकार सुरु होतो. बेशिस्त पार्किंवर त्वरीत कारवाई करा अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.









