नविन संसदेत लावण्यात आलेल्या लुंबिनी आणि कपिलवास्तु यासारख्या प्राचीन स्थळांचे भित्तीचित्रामुळे नेपाळमध्ये अस्वस्थता निर्णाण झाली आहे. आपल्या वारसास्थळांचा उपयोग केल्याबद्दल नेपाळमध्ये निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. पंतप्रधान पुष्प कमल दहल यांचा पुर्वनियोजित भारत दौरा येत्या काही दिवसामध्ये संपन्न होत आहे.
नवीन संसदेच्या म्हणण्यानुसार, प्राचीन भारतीय विचारांचे चित्रण करणाऱ्या या भित्तिचित्रांद्वारे ‘अखंड भारत’ किंवा एकसंध भारताचे प्रतिनिधित्व होत आहे. या भित्तीचित्रांमध्ये शेजारील नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यासारख्या अनेक देशांचा समावेश आहे.
नेपाळच्या अनेक राजकिय नेत्यांनी पुष्पकमल दहल यांच्याकडे हे प्रकरण भारतीय अधिकाऱ्यांकडे मांडून भित्तीचित्र काढण्य़ास सांगावे अशी विनंती केली आहे. देशातील महत्वाच्या राजकिय नेत्यापैकी असलेल्या माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही या चित्रांचा निषेध करून समावेश होता.
मुख्य विरोधी सीपीएन-यूएमएल पक्षाचे नेते ओली यांनी या संबंधी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या पक्षातील मुख्यालयात पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “हे योग्य आणि न्याय्य नाही. भारतासारखा देश जो स्वतःला एक प्राचीन आणि मजबूत देश म्हणतो. तसेच लोकशाहीचा आदर्श उदाहरण असलेला भारत देश नेपाळसारखा स्वतंत्र देश आपल्या नकाशाला जोडत आहे. आणि तोच नकाशा संसदेत लटकवत आहे. अशा कृतीला न्याय्य म्हणता येणार नाही.” अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.