देशी विदेशी 250 हून अधिक श्वान प्रदर्शनात सहभागी
प्रतिनिधी/ सातारा
स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत व श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूह, जय सोशल फौंडेशनच्या वतीने छत्रपती कृषी 2022 भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी, औद्योगिक, वाहन व पशु पक्षी प्रदर्शन 2022 चे स्मार्ट एक्सपो यांच्यावतीने आयोजित केलेल्या सातारा जिल्हा परिषद मैदानावरील छत्रपती कृषी औद्योगिक वाहन महोत्सव प्रदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या डॉग शो प्रचंड विक्रमी प्रतिसाद लाभला. सातारा जिल्हा तसेच परत जिह्यातूनही या शोसाठी 250 हून अधिक श्वान व त्यांचे मालक उपस्थित होते.
चार तास चाललेल्या या अनोख्या उपक्रमाला शेकडो सातारकरांनी गर्दी करून उपस्थिती केली होती. या डॉग शोच्या प्रदर्शनामध्ये पर्यवेक्षक (पंच)-म्हणून विजय कदम, धिरेन राजपुरोहित, अजित शिंदे यांनी काम पाहिले. या डॉग शोमध्ये भारतीय श्वान -मुदळ, हाऊंड, ग्रे हाउंड, कारवान, विपिट, पश्मी सहभागी झाले होते. डॉग शो मध्ये भारतीय प्रजातीचे श्वान 5000 पासून 50000 किमतीचे श्वान सहभागी झाले होते.
परदेशी श्वान (प्रजाती) मध्ये लेब्राडॉर, जर्मन शेफर्ड, डोबर म्यान, सायबेरियन, हस्की, रॉटव्हीलर, कॉकर, स्पणील्स, गोल्डन रेट्रिवर, पिटबुल, प्रेंच मस्तीफ, पगमीन – पिनलासा अफसोशित्झुग्रेट डेन, डॅश, हौन्स सहभागी झाले होते.
परदेशी प्रजातीचे श्वान 15000 पासून 1 लाख किमतीचे श्वान सहभागी झाले होते. या श्वान प्रदर्शनाच्या विशेष आणि अतिशय उत्कृष्ट संयोजनासाठी- विनोद गुरव, प्रसाद पाटील, दत्ता जाधव यांचे सहकार्य लाभले होते. या श्वान प्रदर्शनानंतर झालेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजू शेठ राजपुरोहित यांनी बक्षीस पात्र श्वान आणि त्यांच्या मालकांना ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र वितरित केले. याप्रसंगी जय सोशल फाउंडेशनचे प्रमुख सागर भोसले स्मार्ट एक्सपो व या प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक सोमनाथ शेटे, सौ. रेखा शेटे यांच्यासह सातारा जिह्यातील श्वानप्रेमींची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
स्पर्धेमध्ये मनीषा जाधव यांच्या लासा, अजित असावे यांच्या पगमेल, रणजीत शिर्के यांच्या विपेट, श्वेता चव्हाण यांच्या लर, सनी शिंदे यांच्या पामेरियन, बबलू लादे यांच्या डॉबरमॅन राहुल मोहिते यांच्या पिटबुल यांना गौरवण्यात आले, तर पप्पी डॉग प्रकारात अमोल बनकर यांच्या जर्मन शेफर्ड स्रोहन जगदाळे यांच्या लोक फिमेल, शोभा गुदगे यांच्या हानी यांना गौरवण्यात आले इतर ब्रीड प्रकारात शिवम इंगळे यांच्या कारवान जातीच्या कुत्र्याला गौरवण्यात आले.
निवड समितीसाठी जय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले, विनोद गुरव, दत्ता जाधव आदींनी काम पाहिले.








