वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
अलतगे येथे मोठ्या अभूतपूर्व उत्साहात दुर्गामाता दौडीला प्रारंभ करण्यात आला. दुर्गा माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय अशा घोषणा देऊन वातावरण शिवमय करण्यात आले. दौडीमध्ये सुमारे 250 शिवप्रेमींनी व बालचमूंनी सहभाग घेतला होता. शिवाजी चौक येथून दौडीला प्रारंभ करण्यात आली. यावेळी देवस्थान पंच कमिटीतर्फे शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. ब्रह्मलिंगेश्वर ट्रस्ट कमिटीतर्फे ध्वज पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शस्त्र पूजन व दुर्गामाता मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून शिवाजी महाराज चौक येथून दौडीला प्रारंभ करण्यात आला. दौड संपूर्ण गावभर फिरवून झाल्यानंतर श्री ब्रह्मलिंगेश्वर मंदिर येथे सांगता करण्यात आली.









