प्रवाशांना नाहक मनस्ताप| बस उपलब्ध नाहीत; व्यवस्थापक करतात कारण पुढे
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली येथून सकाळी 7 वाजता सुटणारी “कणकवली-लातूर” या एस.टी.बसचे वेळापत्रक कोलमडले असून, त्याचा नाहक त्रास प्रवाशीवर्गाला सहन करावा लागत आहे.
कणकवली आगाराची सकाळी 7 वाजता सुटणारी फोंडाघाट मार्गे”कणकवली-लातूर” ही एस.टी.बस सातत्याने गेली दीड/दोन महिने अनियमित सोडली जात असून, प्रवासी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे. या बसला नियमित प्रवासी वर्गाबरोबर शासकीय अधिकारी/कर्मचारी असतात. बस वेळेत न सुटल्यामुळे शासकीय कार्यालयात वेळेत पोहचता येत नाही.
दि. 16 ऑक्टोबर आणि दि. 25 ऑक्टोबर 2023 या दिवशी बस वेळेत सोडण्यात आलेली नाही. बस उपलब्ध नाही अशी शुल्लक कारणे देऊन, वेळेत बस सोडली जात नाही. आगार व्यवस्थापक श्री. यादव आणि स्थानक प्रमुख यांच्या दुर्लक्षपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांनी तातडीने याबाबत लक्ष देऊन, बस वेळेत सोडून प्रवाशी वर्गाला दिलासा द्यावा,असे आवाहन करण्यात येत आहे.









