वृत्तसंस्था/ सारब्रुकेन, जर्मनी
भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू उन्नती हुडाचे येथे सुरू असलेल्या हायलो ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या अग्रमानांकित पुत्री कुसुमा वरदानीने तिला पराभूत करीत अंतिम फेरी गाठली.
18 वर्षीय उन्नतीने वरदानीच्या तोडीस तोड खेळ केला. पण 35 मिनिटांच्या खेळात तिला वरदानीने 21-7, 21-13 असे नमविले. गेल्या महिन्यात गुवाहाटीत झालेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनियर मिश्र सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारताने कांस्यपदक पटकावले होते. त्या संघात उन्नतीचाही समावेश होता.









