शिरोळ पोलिसांनी तरुणाला केले जेरबंद, ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर
शिरोळ तालुक्यातील अमोल शंकर खडके (वय २८ वर्षे, रा. खडके मळा, सरकारी आयटीआय जवळ) याला बिना परवाना गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अकट केले आहे. आरोपी खडके याला जयसिंगपूर न्यायालयात हजर केले. त्याला १५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक डॉ. सौ रोहिणी सोळंके व पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली.
याबाबत माहिती देताना, सौ सोळंके व गायकवाड म्हणाले की, गोपनीय बातमीदारांमार्फत अमोल खडके हा शिरोळ येथील घालवाड फाटा याठिकाणी बिना परवाना गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणा असल्याची माहिती मिळाली. यानंतर घालवाड फाटा येथे पोलिसांनी सापळा रचून खडके यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी खडकेने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे हत्यार परवाना आहे का, याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. यामुळे त्याच्याकडील बिना परवाना गावठी पिस्तूल जप्त करून सदर तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे . सदरची गावठी पिस्तूल चाळीस हजार रुपये किंमतीची आहे. ही पिस्तूल मेटल बॉडी ची असून त्यात बॅरल, हॅमर, ट्रिगर तसेच पिस्तूल ग्रीपवर दोन्ही बाजूस काळ्या रंगाचे फायबर व मॅक्झिन नसलेली जुनी वापरती पिस्तूल असल्याचे सांगितले आहे. तसेच २५ हजार रुपये किंमतीची मोटरसायकल असे एकूण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपीवर शिरोळ पोलीस ठाणेत भारतीय शस्त्र अधिनियमचे ३ ,२५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभागाच्या रोहिणी सोळंके म्हणाल्या, की खडके हा गावठी पिस्तूल कुठून आणली आणि याच्यासंबंधी अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाचांद पटेल, पोलीस कॉन्स्टेबल रहमान शेख, पोलीस कॉन्स्टेबल युवराज खरात, पोलीस कॉन्स्टेबल सुशांत ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल ओबासे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप कुंभार ,पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज मडीवाळ यांनी केली .








