सांगली :
घराच्या अंगणात लावलेली दुचाकी तेथून काही अंतरावर नेवून पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील अष्टविनायक कॉलनीतील सावंत प्लॉटमध्ये घडली. याबाबत परशराम सुदाम पोतदार (रा. अनुसया निवास, अष्टविनायक कॉलनी, जासुद मळा, सांगली) यांनी विश्श्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
परशराम पोतदार यांनी बुधवारी त्यांची दुचाकी (क्र. एमएच १० सीई ६२८१) घराच्या अंगणात लावली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने तेथून दुचाकी चारशे मिटर अंतरावर असणाऱ्या सावंत प्लॉटमधील झुडपात नेली आणि पेटवून दिली. यामध्ये दुचाकीचे १० हजाराचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.








