पृथ्वीच्या इतिहासासह अनेक रहस्यांची उकल होणार
कुठलेही जुने शहर किंवा जागेच्या शोधात माणूस कुठे ना कुठे जात राहिला आहे. सद्यकाळात माणसाने पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात धडक मारली आहे. परंतु अद्याप महासागरांच्या खोलात असलेल्या रहस्यांपासून तो अजाण आहे. असेच एक अनोखे शहर 25 वर्षांपूर्वी शोधण्यात आले होते, ज्यात 1.2 लाख वर्षापूर्वी ‘आगी’प्रमाणे अत्यंत तप्त गोष्टी बाहेर पडत होत्या, त्याबाबत संशोधन सुरू आहे. वेज्ञानिकांनी या लॉस्ट सिटीच्या नावाने प्रसिद्ध ठिकाणापासून दीड किलोमीटर लांबीचा एक हिस्सा काढला असून तो जीवनाच्या रहस्याची उकल करण्यास मदत करू शकतो आणि याचे कनेशक्न सौरमंडळाच्या मोठ्या ग्रहांच्या चंद्रांशी देखील आहे.
कुठे आहे हे शहर
25 वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी अटलांटिक महासागरांदरम्यान शिखरांच्या 15 किलोमीटर पश्चिमेला एटलांटिस मॅसिफनजीक समुद्राच्या पृष्ठभागापासून 2300 फूट खोल अत्यंत प्राचीन हायड्रोथर्मल वेंट सिस्टीम शोधली होती, ज्याच्या शेकडो टॉवर्समधून आगीप्रमाणे तप्त अल्कलाइन द्रव्य आणि हायड्रोजन वायू निघत होते.
किती तप्त राहतो भाग
वैज्ञानिकांनी या पूर्ण भागाला लॉस्ट सिटी नाव दिले. येथे 1.2 लाख वर्षांपासून पृथ्वीच्या मेंटलच्या येथे सागरी पाण्याने प्रतिक्रिया होत राहिली, ज्यामुळे महासागरात हायड्रोजन आणि मिथेन वायूसोबत काही द्रव्यांची देखील गळती होत राहिली. याचे तापमान सुमारे 90 अंश सेल्सिअसपर्यंत राहत हेत. महासागराच्या इतक्या खोल पाण्यात इतकी उष्णता चकित करणारी बाब आहे.
जागतिक वारसा
कन्व्हेंशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटीने याची ओळख पारिस्थितिकी आणि जैविक स्वरुपात अत्यंत खास सागरी भाग म्हणून केली आहे. तसेच या जागेला जागतिक वारसास्थळ घोषित करण्याची शिफारस केली आहे. मागील वर्षी येथे 1268 मीटर लांब एक मेंटल खडक शोधण्यात आला, ज्यात जीवसृष्टीच्या प्रारंभीचे पुरावे मिळू शकतात असे मानले जात आहे.
कशाप्रकारची जीवसृष्टी
लॉस्ट सिटीच्या चिमण्यांमध्ये सुक्ष्म जीवन आहे. येथे सर्पेन्टिनायजेशन आणि त्याच्याशी निगडित भू-रासायनिक प्रतिक्रियांनी निर्माण होणारा हायड्रोजन वायू आणि जैविध अणूंद्वारे येथील जीवनाला शक्ती मिळते. येथे कणा नसलेले जीव, क्रस्टेशियन्स, गॅस्ट्रोपॉड अणि अन्य कीडे देखील दिसून आले आहेत. याचबरोबर आणखी एका कारणामुळे या कालौघात हरवलेल्या शहराला महत्त्व दिले जात आहे. 2018 मध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट विलियम ब्रेजलटन यांनी अशाप्रकारची इकोसिस्टीम शनिचा चंद्र एन्सेलेडस किंवा गुरुचा चंद्र युरोपच्या बर्फाळ पृष्ठभागामधील महासागरांमध्ये असू शकते असे म्हटले आहे.









