मालवण पोलिसांच्या वतीने आयोजित
मालवण/प्रतिनिधी
मालवण पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी 07:00 वा ते 09:00 वाजण्याच्या दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त ” रन फॉर युनिटी ” या एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दौड देऊळवाडा ते रेवतळे तिठा ते देऊळवाडा अशी सागरी महामार्गावर आयोजित करण्यात आली असून मालवण पोलीस ठाण्यातील अधिकारी ,अंमलदार, पोलीस पाटील तसेच मालवण शहरातील रोटरी , लायन्स क्लब, पत्रकार संघ व्यापारी संघ, आस्था ग्रुप, मातृत्व आधार, ग्लोबल रक्तदाते, स्वराज्य संघटना तसेच इतर सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक सहभागी होणार आहेत. या दौडमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे व्हाईट टी शर्ट आणि ट्रॅक पँट अशा पेहरावात सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा जागर करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले आहे.









