पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ : विविध भाषांमध्ये दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा : उन्हाळी सुटीसाठी मुलांना ‘होमवर्क’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातच्या 120 व्या भागात हिंदू नववर्षाचा उल्लेख करत देशवासियांना चैत्र नवरात्र, गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांनी भारताच्या एकता आणि विविधतेच्या भावनेचे कौतुक केले. तसेच यावेळी त्यांनी परीक्षा देऊन सुटीची मजा लुटत असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन कामही दिले आहे. या उन्हाळी सुटीमध्ये विद्यार्थ्यांनी काहीतरी नवीन शिकावे असे ते म्हणाले. तसेच आपले कौशल्य ष्श्ब्प्दत्ग्daब् या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करायचे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 120 व्या भागात भाषण दिले. यादरम्यान त्यांनी ‘आज, एका अतिशय शुभ दिवशी, मला तुमच्याशी ‘मन की बात’बद्दल बोलण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्र सुरू होत असल्याचा उल्लेख त्यांनी प्राधान्याने केला. भारतीय नववर्षाची सुरुवातही आजपासून होत आहे. ही विक्रम संवत 2082 ची सुरुवात आहे. तसेच आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. हा खूप पवित्र दिवस आहे. हे सण आपल्याला भारतातील विविधतेतील एकतेची अनुभूती देतात, असे पंतप्रधान म्हणाले.
आता देशात रमजान ईदचा सण येत आहे. येणारा संपूर्ण महिना सण आणि उत्सवांनी भरलेला असेल. या सणांच्या निमित्ताने मी देशातील जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आपले हे सण वेगवेगळ्या प्रदेशात असू शकतात, परंतु ते भारताच्या विविधतेमध्ये एकता कशी विणली गेली आहे हे दर्शवितात. आपल्याला ही एकतेची भावना सतत बळकट करायची आहे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
वेगवेगळ्या भाषांमध्ये संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्नड आणि तेलुगू भाषांमधील उगादी सणाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय त्यांनी कोकणी भाषेत संसार पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी मराठी भाषेत गुढी पाडव्याच्या, मल्याळम भाषेत विशु सणाच्या आणि तमिळ भाषेत नवीन वर्षाच्या (पुथांडू) शुभेच्छा दिल्या. आजपासून आणि पुढील काही दिवसांत आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नवीन वर्ष सुरू होत आहे हे सर्व संदेश नवीन वर्षाच्या आणि विविध सणांच्या शुभेच्छांचे आहेत, म्हणून लोकांनी मला वेगवेगळ्या भाषांमध्ये शुभेच्छा पाठवल्या आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
उन्हाळी सुटीत काहीतरी नवीन शिका!
आज मुले नवीन प्लॅटफॉर्मवरून खूप काही शिकू शकतात. कोणी तंत्रज्ञानाबद्दल शिकू शकते, तसेच कोणीतरी नाटक किंवा भाषणकौशल्य शिकू शकते. भाषण आणि नाटक शिकवणाऱ्या अनेक शाळा आहेत. शालेय शिक्षणासोबतच हे बाह्या शिक्षणही मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या स्वयंसेवी उपक्रमांमध्ये आणि सेवाकार्यात मुले सहभागी होऊ शकतात. जर कोणतीही संस्था, शाळा किंवा सामाजिक संस्था उन्हाळी उपक्रम आयोजित करत असेल तर विद्यार्थ्यांनी आपले कौशल्यशिक्षण ष्श्ब्प्दत्ग्daब् वरून आमच्यासोबत शेअर करावे, असे मोदी म्हणाले. तसेच आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन मुलांनी संविधानाच्या मूल्यांबद्दल जागरुकता करावी, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.









