चषकाचे अनावरण : 16 संघांचा सहभाग
बेळगाव : युनायटेड गोवन्स रिक्रेशन संघटना आयोजित युनायटेड चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा शुक्रवार दि. 15 पासून सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या युनायटेड गोवन्स चषक स्पर्धेच्या चषकाचे अनावरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सचिव इग्नेसस मस्करन्स, प्रशांत हिरेमठ, विलियम मेनिजिस, सुनील कल्याणपूरकर, संपत तिगडी, जॉर्ज रॉड्रीग्ज, मन्युअल कार्वालो, विजय रेडेकर व अभिषेक चेरेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चषकांचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी भाग घेतला असून अ गटात सेंट झेवियर्स, मुक्तांगण, बेन्सन्स, सेंट जोन काकती, सर्वोदय खानापूर, केव्ही 3, कनक, सेंट मेरीज तर ब गटात संत मीरा, ज्योती सेंट्रल, फिनिक्स, हेरवाडकर, एमव्हीएम, ज्ञान प्रबोधन, शेख सेंट्रल व केएलएस संघांचा समावेश आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना केएलएस व शेख सेंट्रल यांच्यात सकाळी 9 वाजता होणार आहे. तर दुसरा एमव्हीएम विरुद्ध ज्ञान प्रबोधन यांच्यात 10 वाजता खेळवण्यात येणार आहे.









