जपानमध्ये सोबत न्यावे लागणार नाहीत कपडे
जपान एअरलाइन्सन्sढ एक नवा क्लोदिंग रेंटल प्रोग्राम सुरू केला आहे. यामुळे जपानमध्ये येणाऱ्या लोकांना आता स्वत:सोबत कपडे आणावे लागणार नाहीत. प्रवाशांना जपानमध्ये पोहोचताच भाडेतत्वावर कपडे मिळविता येतील आणि जपानमध्ये जितके दिवस वास्तव्य कराल तितके दिवस कपड्यांचा वापर करता येणार आहे. या सुविधेमुळे जपानसाठीचा प्रवास करणाऱ्या लोकांना बॅग वाहून नेण्याची गरज भासणार नाही.
जपान एअरलाइन्स आणि जपानच्या प्रख्यात कंपन्यांपैकी एक सुमितोमो कॉर्पोरेशनने अशा लोकांसाठी ‘एनिवियर, एनिवेअर’ ट्रायल प्र्रोग्राम सुरू केला आहे, जे जेएएलच्या फ्लाइट्सचा वापर करतात. कोरोना महामारीचा प्रभाव ओसरल्यावर अधिकाधिक लोकांनी पुन्हा विमानप्रवास सुरू केला आहे. प्रवासी स्वत:चे वास्तव्य, वाहतूक, सामन इत्यादीसंबंधी अधिक टिकावू पर्याय निवडण्याची इच्छा बाळगतात. बहुतांश प्रवाशांना नव्या देशात रेस्टॉरंटमध्ये जेवण अन् हॉटेलमध्ये वास्तव्य आवडत असते. परंतु ते सर्वसाधारणपणे स्वत:चे कपडे घरातूनच आणतात. अशा स्थितीत जेएएलने प्रवाशांना ‘स्वत:चे कपडे, भोजन आणि वास्तव्याच्या सर्व गोष्टींसाठी स्थानिक पर्यायाचा वापर करण्याची संधी मिळावी अशी योजना आखली आहे. यामुळे प्रवासाला अधिक टिकावू अनुभवांमध्ये बदलता येईल असे जपान एअरलाइन्सचे सांगणे आहे.

एअरलाइन्स भाडेतत्वावर उपलब्ध कपड्यांचा स्टॉक ठेवणार आहे. प्रवाशांसाठी चेक-इन करण्यात आलेल्या सामग्रीच्या वजनात बदलावर देखरेख ठेवली जाईल आणि योजनेच्या चाचपणीचा प्रभाव पाहिला जाईल. या सेवेद्वारे विमानाच्या वजनात घट करत कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्याच्या प्रभावाला पडताळून पाहिले जाणार असल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले.
जपानसाठी प्रवास करणाऱ्या लोकांना एक महिन्यापूर्वी ‘एनिवियर, एनिवेयर’ बुकिंग साइटच्या माध्यमातून स्वत:चे कपडे बुक करता येतील. व्हिजिटर उपलब्ध स्टॉकमधून चांगले कपडे निवडू शकतात. एअरलाइन्सनुसार कपडे पिकअप डेटच्या दोन आठवड्यांच्या आत परत केले जाणे अपेक्षित आहे.
प्रवाशांना स्वत:ची फ्लाइट बुकिंग, पिकअप अन् परत करण्याची तारखी, स्वत:चे डेस्टिनेशन नोंद करावे लागणार आहे. प्रवाशांना कमीत कमी सामानासह प्रवास करता यावे म्हणून एअरलाइन्स त्यांच्या हॉटेल्समधून कपड्यांची डिलिव्हरी आणि पिक-अप सुनिश्चित करणार आहे.
भाडेतत्वावरील कपड्यांसाठी खर्च
एअरलाइन्सनसुसार चाचणी कार्यक्रम आतापासून 31 ऑगस्टपर्यंत म्हणजेच 14 महिन्यांपर्यंत चालणार आहे. याच्या अंतर्गत प्रवासी कॅज्युअल किंवा स्मार्ट कॅज्युअल बुक करू शकतात. भाडेतत्वावरील कपड्यांच्या किमती सुमारे 28 डॉलर्सपासून सुरू होणार आहेत.









