वेड्यांसारखे नाचत या अन्…..
सर्वसाधारणपणे लोक कुठल्याही कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये पैसे देऊन खाद्यपदार्थ मिळवत असतात. परंतु अलिकडेच एका बेकरीने स्वत:च्या आउटलेटमध्ये मजेशीर ऑफर सुरू केली. ही ऑफर एक दिवसासाठी होती. यावरून जे काही घडले, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत चर्चेत आला आहे.

इंग्लंडच्या रेडलेट भागात बेगल्स अँड स्मेइर नावाच्या बेकरीने एक पोस्टर झळकविले होते. यावर ‘वेड्यांसारखे नाचत या आणि आम्हाला तुमचा नाच आवडल्यास बेगल चिप्स मिळवा’ असे लिहिले गेले होते. लोकांनी या ऑफरला गांभीर्याने घेत अजब नृत्य करत बेकरीत प्रवेश केला आहे. हे मजेशीर दृश्य दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत कुणी रोबोटसारखा नाचताना दिसून आला, तर कुणी स्वत:च्या लहान मुलांसोबत नाचत होते.
बेकरीच्या मालकीण प्रेंसेस्का यांना मार्केटिंगची ही जबरदस्त कल्पना सुचली होती. आता बेकरीकडून एक आकर्षक संदेश जारी करण्यात आला आहे. तुम्हा सर्वांचे धन्यवाद, आम्ही तुमच्यावर भरपूर प्रेम करतो असे यात नमूद आहे. फ्रेंसेस्का यांचा हा प्रयत्न ग्राहकांना पसंत पडल्यास सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवत आहे. याच्याशी निगडित व्हिडिओत कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे. ही कल्पना अत्यंत आवडली, मी माझ्या बेकरीत देखील ही कल्पना अंमलात आणेन असे एका युजरने म्हटले आहे.









