प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमण्णा सोमवार दि. 15 रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. बेळगाव व खानापूर येथील उड्डाणपुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी 1.15 वाजता हुबळी येथून ते बेळगाव रेल्वेस्थानकावर पोहोचतील. दुपारी 3 वाजता अनगोळ येथील रोड अंडरब्रिजच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 4.15 वाजता ते बेळगावहून खानापूरला रवाना होतील. सायंकाळी 5 वाजता खानापूर येथील रोड अंडरब्रिजच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता ते बेळगावच्या दिशेने रवाना होतील. 6.45 वाजता बेळगाव सांबरा विमानतळ येथे पोहोचतील व सायंकाळी 7.50 वाजता विमानाने बेंगळूरला रवाना होणार आहेत.









