सावंतवाडी | प्रतिनिधी
केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी अजय कुमार मिश्रा उद्या शनिवारी 16 डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . सकाळी 10:30 वाजता माणगाव येथे केंद्र सरकारच्या योजनांची माहिती तसेच 11:30 वाजता सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायत येथे, त्यानंतर सावंतवाडी शहरातील गवळी तिठा येथील भाजपच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क कार्यालय येथे दुपारी1.30 वाजता ते भेट देतील . त्यानंतर मोपा मार्गे दिल्ली येथे रवाना होणार आहेत . तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले आहे.